स्किन केअर रुटीनमध्ये अक्रोडचा कसा आणि किती प्रमाणात समावेश करावा?
सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतो. आपल्या नित्यक्रमामध्ये तुम्ही पौष्टिक आहारासह सुकामेव्याचेही सेवन करू शकता. अक्रोडमध्येही मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा साठा आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभही मिळतात. अक्रोडचे सेवन करणं आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. यातील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास आणि त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर होण्यास मदत मिळते. अक्रोडचा उपयोग स्क्रब, फेस पॅक, मॉइश्चराइझर इत्यादी स्वरुपात केला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा नियमित योग्य प्रमाणात वापर केल्यास तुमच्या त्वचेवर सकारात्मक बदल पाहायला मिळतील. अक्रोडमधील पोषण तत्त्वांमुळे हे बदल घडतात. यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. (Aloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते? वाचा माहिती)Natural Skin Care आपल्या त्वचेसाठी अक्रोड लाभदायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अक्रोडपासून तयार करण्यात आलेले तेल किंवा फेस पॅक तुम्ही आपल्या चेहऱ्यावर लावू शकता.
सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतो. आपल्या नित्यक्रमामध्ये तुम्ही पौष्टिक आहारासह सुकामेव्याचेही सेवन करू शकता. अक्रोडमध्येही मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा साठा आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभही मिळतात. अक्रोडचे सेवन करणं आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते.
यातील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास आणि त्वचेवरील सुरकुत्या देखील दूर होण्यास मदत मिळते. अक्रोडचा उपयोग स्क्रब, फेस पॅक, मॉइश्चराइझर इत्यादी स्वरुपात केला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा नियमित योग्य प्रमाणात वापर केल्यास तुमच्या त्वचेवर सकारात्मक बदल पाहायला मिळतील. अक्रोडमधील पोषण तत्त्वांमुळे हे बदल घडतात. यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
(
Aloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते? वाचा माहिती
)
डार्क सर्कल आणि सूज कमी करण्यासाठी
अपुरी झोप, ताणतणाव, थकवा, गॅजेट्सचा वापर इत्यादी कारणांमुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे डार्क सर्कल आणि डोळे सुजण्याची समस्या निर्माण होते. या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी नियमित अक्रोडचे तेल वापरावे. या तेलाचा कसा, किती प्रमाणात आणि कधी वापर करावा? याबाबत आपल्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे.
(
Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
)
त्वचा हायड्रेड राहते
अक्रोड हे एक नैसर्गिक मॉइश्चराइझिंग एजंट आहे. त्वचा हायड्रेट करण्यासाठी अक्रोडच्या तेलाचा उपयोग केला जातो. आपली त्वचा हे तेल चांगल्या पद्धतीने शोषून घेते. अक्रोडच्या तेलाचे काही थेंब घेऊन आपल्या चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करावा. चेहऱ्याच्या त्वचेवर जोर देऊ नये. मसाजनंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.
(
Hair Care केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका, या नैसर्गिक सामग्रींनी हेअरवॉश करून पाहा
)
त्वचेवर येते नैसर्गिक चमक
अक्रोडमध्ये नैसर्गिक स्वरुपात रासायनिक गुणधर्म आहेत. ज्यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास मदत मिळते. अशा पद्धतीने शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. रक्त प्रवाह सुरळीत सुरू असल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. दिवसभरात तीन ते चार अक्रोडचे सेवन केल्यास त्वचा सतेज दिसू शकते.
(
Natural Skin Care घरच्या घरी कसे तयार करायचे ऑरेंज पील ऑफ मास्क?
)
वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक कोलेजन आणि पेशी दुरुस्ती करण्याचे कार्य करतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. तसंच वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात. उदाहरणार्थ चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरुम इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासाठी अक्रोड खाण्यासह याच्या तेलाचाही वापर करू शकता.
(
Hair Care Tips आंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा
)
अक्रोड फेस पॅक
अक्रोडचे फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा अक्रोड पावडरमध्ये थोडेसे ऑलिव्ह ऑइल, गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. सर्व सामग्री मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
(
Skin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का? जाणून घ्या या ५ गोष्टी
)
केसांसाठी अक्रोडचा वापर
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३ आणि पोटॅशिअम यासारख्या पोषक तत्त्वांचे प्रमाण भरपूर आहे. या घटकांमुळे केसगळती, केस तुटणे इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळते. अक्रोडमधील पोषक तत्त्वांमुळे केस मजबूत आणि निरोगी राहतात. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अक्रोडच्या तेलानं केसांना मसाज करावा. तसंच आपल्या आहारातही या तेलाचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकते.
(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक?)
NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
from Lifestyle Tips in Marathi, Tips for Healthy Lifestyle in Marathi, Health Tips & Latest Fashion Trend - जीवनशैली टिप्स, निरोगी जीवनशैली टिप्स, सौंदर्य टिप्स, लाइफस्टाइल टिप्स https://ift.tt/30gqG5z
No comments