हाथरस गँगरेप : अखेर पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली
हाथरस, : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये पीडित मुलीनं एम्स रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. सामूहिक बलात्कारानंतर १५ दिवसांनी (मंगळवारी) मुलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी अत्यंत गंभीर परिस्थितीत तरुणीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी पहाटे ४.०० वाजता तिची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली. जीभ कापली, पाठीचा कणा मोडला १९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले. तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती आणि आज तिची ही लढाई अर्धवट राहिली. वाचा : वाचा : पोलिसांवर बेजबाबरपणाचा आरोप या प्रकरणात पोलिसांवरही बेजबाबदारीचा आरोप करण्यात आलाय. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलीला अलीगढच्या जे एन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तरुणावर बलात्काराचा नाही तर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मीडियामुळे उजेडात आल्यानंतर पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं. नऊ दिवसानंतर पोलिसांनी या मुलीचा दोन पानांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर पीडित मुलीची जीभ कापण्यात आली होती. तसेच तिचा पाठीचा कणाही तोडण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला. चार नराधमांना अटक या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. हे चौघे तरुणीच्या गावातील रहिवासी आहेत. आरोपींची नावं संदीप, लवकुश, रामू आणि रवि अशी आहेत. यातील संदीप याला १४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर रामू आणि लवकुशही पोलिसांच्या तावडीत सापडले. तर पोलीस तपास सुरू झाल्यानंतर फरार झालेल्या रवी या आरोपीच्याही पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी मुसक्या आवळल्या. वाचा : वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2G8aYmd
No comments