मुंबई: सायन-पनवेल हायवेवर विचित्र अपघात, ३० वाहने एकमेकांवर आदळली
मुंबई: येथील महामार्गावर आज सकाळी विचित्र झाला. ३० वाहने एकमेकांवर आदळली. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. सायन-पनवेल महामार्गावर सुरक्षिततेची काळजी न घेता काम सुरू आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी १०.१५ वाजता दोन विचित्र अपघात झाले. एका अपघातात वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे २२ वाहने एकमेकांवर आदळली. तर दुसऱ्या एका अपघातात ७ वाहनांची धडक झाली. अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातांत जिवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सायन-पनवेल महामार्गावर कॉक्रिट रस्त्यावरील भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम केले जात होते. मात्र कळंबोली उड्डाणपुल चढून गाड्या भरधाव वेगात खाली उतरत असताना समोर कामगार असल्याने वाहनांना ब्रेक दाबावा लागला. त्यामुळे हे अपघात झाल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले. आणखी बातम्या वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kSGJhM
No comments