इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. डब्ल्यूीआय क्रूड तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढले आणि ४०.२ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावले. चीनकडून मागणीत वाढ झाल्याने अमेरिकी तेल उत्पादन प्रक्रियांतील वाढ झाकोळली गेली. चीनने सप्टेंबर २०२० मध्ये ११.८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी आयात केली. कार्गोने सीमाशुल्क वसूल केल्यामुळे ही वृद्धी वार्षिक वृद्धी १.७५ टक्के एवढी झाली. डेल्टा चक्रीवादळामुळे आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेतील मेक्सिकोतील खाडीतील ऊर्जा उत्पादनात मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे तेलातील लाभही मर्यादित राहिला. लिबियातील सर्वात मोठे शरारा तेल क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरू झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, मागणीतील घसरणीची चिंता अद्याप कायम आहे. यासोबतच, कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर पुन्हा लॉकडाऊन लादण्यात आल्याने कच्च्या तेलातील नफ्यावर आणखी मर्यादा आल्या. ओपेकने जागतिक मागणी वेगाने सुधारण्याबाबत नकारात्मक संकेत दिल्याने कच्च्या तेलातील नफ्यावर आणखी दबाव आला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार पुढील महिन्यात ७ मोठ्या शेल फॉर्मेशनमधील तेल उत्पादनात १२१००० बॅरलची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र देशांतर्गत इंधनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. कंपन्यांनी तूर्त दरवाढीऐवजी किमती जैसे थे ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/340ueLw
No comments