ads

Breaking News

पुण्यात खळबळ; मध्यरात्री दुचाकींची तोडफोड आणि जाळपोळ

म. टा. प्रतिनिधी, : रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींची तोडफोड करत टोळक्याने त्या जाळल्याचा प्रकार समोर आला. येथील लक्ष्मीनगर भागात हा प्रकार घडला. यामध्ये सहा दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत सोमनाथ गायकवाड (वय ३५, रा. लक्ष्मीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तक्रारदार गायकवाड हे लक्ष्मीनगर भागात राहण्यास आहेत. हा परिसर दाटीवाटीचा आहे. यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली असतात. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री अचानक दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने दशहत माजवत गोंधळ घातला. यामध्ये सहा दुचाकींची तोडफोड करत त्या पेटवून दिल्या. यामध्ये काही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तणाव देखील निर्माण झाला आहे. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक ननावरे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेतली. तसेच तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आणखी बातम्या वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31bU5OC

No comments