ads

Breaking News

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात सुनावणी काही काळासाठी तहकूब, 'हे' कारण

नवी दिल्ली: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मराठी आरक्षणात्या पुनर्विचार याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी सरकारी वकीलच उपस्थित राहिले नाहीत. यामुळे ही सुनावणी काही काळासाठी तहकूब करावी लागली. मराठा आरक्षणावरील स्थिगिती उठवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थिगिती दिल्यानंतरची आजची पहिलीच सुनावणी होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले होते. या प्रकरणी आरोप प्रत्यारोप देखील झाले होते. त्यानंतर होत असलेल्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असे असताना महाराष्ट्राचे सरकारी वकील मुकूल रोहतगी हे कोर्टात गैरहजर राहिल्याने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब करावी लागली. ही परिस्थिती पाहता आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरो याचिकाकर्ते यांनी केला आहे. कोर्टात सरकारी वकील हजर झाले नाहीत. मात्र आम्ही विनंती केल्यानंतर ही सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. या प्रकरणावर राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसते, असे विनोद पाटील म्हणाले. न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचेही पाटील म्हणाले.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31O699n

No comments