इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या महिन्यात लावलेल्या इंधन दर कपातीला ब्रेक लागला आहे. एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडत असले तर कंपन्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. कंपन्यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. देशात अनलॉक-५ ची घोषणा झाली आहे. यामुळे टाळेबंदी लागलेले अनेक निर्बंध शिथिल होणार आहेत. वाहतूक देखील पूर्वपदावर येणार असल्याने इंधन मागणी वाढेल असा आशावाद पेट्रोलियम कंपन्यांनी व्यक्त केला आहे. वाचा : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण कायम आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३७.४० डॉलर प्रती बॅरल इतके खाली आले. त्यात ३.४१ टक्क्यांची घसरण झाली होती. ट्रम्प दाम्पत्य करोनाबाधित झाल्यांनतर कमॉडिटी बाजारावर पडसाद उमटले. आज मात्र कच्च्या तेलाच्या किमती किंचित सुधारण झाली. सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात ०.५९ टक्के आणि ब्रेंट क्रूडच्या दरात ०.४८ टक्के वाढ झाली आहे. सध्या क्रूडचा भाव प्रती बॅरल ३९ ते ४० डॉलर प्रती बॅरल आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/2F1lprf
No comments