ads

Breaking News

नफावसुली जोरात ; सेन्सेक्स-निफ्टीमधील घोडदौडीला ब्रेक

मुंबई : शेअर बाजारात आज सकाळपासून विक्रीचा सपाटा सुरु झाला आहे. मागील १० सत्रात वधारलेल्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरु केली आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजीला ब्रेक लागला आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३७ अंकांनी घसरला असून तो ४०६५७ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३९ अंकांनी घसरला असून तो ११९३२ अंकावर आहे. आज बाजारात वित्त संस्था आणि आयटी, एफएमसीजी शेअरमध्ये विक्री दिसून आली. सध्या ऍक्सिस बँक , कोटक बँक, आयटीसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर इन्फसिस, ओएनजीसी, टाटा स्टील, एनटीपीसी, एशियन पेंट, एचयूएल आदी शेअर वधारले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मोरॅटोरियम प्रकरणी अनुकुल निकाल दिल्यानंतर गुरुवारी बँकिंग स्टॉक्सला मागणी होती. मात्र आज त्यात नफावसुली दिसून येत आहे. गुरुवारी निफ्टी ०.३१ टक्क्यांची वृद्धी घेत ११,९७१ अंकांवर स्थिरावला. तर सेन्सेक्स बाजार बंद होताना ०.४२ टक्क्यांच्या वृद्धीसह ४०,७९४ अंकांवर स्थिरावला होता. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि एसबीआय या शेअरमध्ये वाढ झाली. निफ्टी-५० मध्ये बजाज फिनसर्व, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि बजाज फायनान्स हे शेअर तेजीसह बंद झाले. एलअँडटी, टाटा स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीज यात तेजी दिसून आली होती. चलन बाजारात रुपयाने डॉलरविरुद्ध ३४ पैशांची वृद्धी घेतली. गुरुवारी रुपया ७३.२९ रुपये मूल्यावर स्थिरावला होता. निफ्टी, विप्रो, एनटीपीसी, टाटा मोटर्स आणि एसबीआय हे सर्वाधिक व्यापार झालेले स्टॉक्स ठरले. नेस्ले इंडिया आणि श्री सिमेंट हे गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले. अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात गुरुवारी निरुत्साह दिसून आला. केओएसपीआय आणि एसएसई कॉम्पोसाइट अनुक्रमे ०.९४ टक्के आणि ०.५६ टक्क्यांनी घसरले. हँगसेंग आणि निक्केई अनुक्रमे ०.०७ टक्के व ०.११ टक्क्यांची वृद्धी घेत स्थिरावले.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/2SXAtto

No comments