ads

Breaking News

पेट्रोल-डिझेल दर; 'हा' आहे आजचा इंधन दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता. अमेरिकेच्या तेलसाठ्यात वाढ झाल्याने तसेच मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाचे दर घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. तेलसाठ्यातील वाढीने तेलाच्या मागणीवर घसरणीचे सावट असून डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.७ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ४०.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. क्रूड पुरवठ्यात विलंबाच्या चिंतेने घसरणीवर मर्यादा आल्या. २ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकेच्या क्रूड यादीत ५०१,००० बॅरल्स अशी किरकोळ वृद्धी नोंदवली. डेल्टा चक्रिवादळ अमेरिकेच्या खाडी किनाऱ्यावर धडकल्यामुळे कच्च्या तेलातील घसरण आणखी मर्यादित राहिली. यामुळे ऊर्जा कंपन्यांना नुकसान टाळण्यासाठी अमेरिकी क्रूड उत्पादनापैकी सुमारे १७% उत्पादन थांबवावे लागले. युनियन आणि नॉर्वेयन तेल व वायू असोसिएशन दरम्यान झालेल्या अपयशी चर्चेमुळे संप अधिक तीव्र झाला. त्यामुळे सिक्स नॉर्वेयन ऑफशोअर तेल व गॅसची सहा क्षेत्रे बंद आहेत. या संपामुळे दिवसाला ३३०,००० बॅरल तेलाचे उत्पादन जोखिमीखाली आहे. त्यामुळेही तेलाच्या किंमतींना आधार मिळाला.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3iJuYsv

No comments