रामजानकी मंदिरातील पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला, पुजारी गंभीर
गोंडा: राजस्थानात करौली येथे एका पुजाऱ्याची हत्या केल्यानंतर उत्तर प्रदेशातील () गोंडामधील एका मंदिराच्या पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे () . येथील इटियाथोक भागातील तिर्रे मनोरमा येथील रामजानकी मंदिराच्या पुजाऱ्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास गोळ्या मारण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या पुजाराऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला लखनऊला नेण्यात आले आहे. दरम्यान पुजाऱ्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. (ram janaki temple priest shot by goons) या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, अतुल बाबा उर्फ सम्राट दास हे राम जानकी मंदिरात पूजापाठ करतात. ते गेल्या दोन वर्षांपासून येथे राहत आहेत. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता काही लोक मंदिरात आले आणि त्यांनी परिसरात गोळीबार केला. या घटनेमागे भूमाफियांचा हात असावा, असे म्हटले जात आहे. क्लिक करा आणि वाचा- मनोरमा उद्गमस्थळाच्या संपत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या मुद्द्यावरून गेल्या वर्षी येथील महंत सीताराम दास यांच्यावर देखील हल्ला झाला होता. पुजाऱ्याने चारही आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, राजस्थानातील करौली येथे एका पुजाऱ्याला जीवंत जाळल्याची घटना शुक्रवारी ९ ऑक्टोबर या दिवशी घडली. जमिनीच्या वादातून गावातील गुंडांनी हे कृत्य केले. गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पुजाऱ्याचे निधन झाले. या घटनेनंतर आता दोनच दिवसांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GCnP0n
No comments