ads

Breaking News

सोने-चांदी स्वस्त ; आज झाली सोने दरात इतकी घसरण

मुंबई : सोने आणि चांदीच्या किमतीत आज सोमवारी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव सध्या ४५० रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या भावात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस सोने ५०००० च्या आसपास राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याआधी गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झाली होती. तर त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त बाजार बंद होता. आज तीन दिवसांनंतर बाजार उघडल्यावर सोने आणि चांदीमध्ये नफावसुली दिसून आली आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारले. ज्यामुळे सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली. गुरुवारी सोने ५०५७० रुपये तर ६११४५ रुपयांवर स्थिरावली होती. जागतिक कमॉडिटी बाजारात सोने सावरले होते. सोन्याचा भाव २.१४ टक्क्यांनी वधारून प्रती औंस १९०४ डॉलरपर्यंत पोहचला. चांदीचा भाव ३.९४ टक्क्यांनी वधारून २३.८७ डॉलर प्रती औंस झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोना संक्रमित झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये उसळी दिसून आली. करोना लग्न झाल्याने ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणूक प्रचाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जाहीर होणाऱ्या पॅकेजबाबत साशंकता निर्माण झाल्याने सोने आणि चांदीच्या किमतींना आधार मिळाला असल्याचे जाणकार सांगतात. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०१४७ रुपये असून त्यात ४२३ रुपयांची घसरण झाली आहे चांदीचा भाव एक किलोला ६०५५६ रुपये असून त्यात ५८९ रुपयांची घसरण झाली आहे. goodreturns या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४२० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०४२० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३८०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९७८० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२६९० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८५२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२९२० रुपये आहे.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3lf4DEp

No comments