ads

Breaking News

उत्तर प्रदेश: बॉयफ्रेंडसह चौघांनी मुलीवर केला सामूहिक बलात्कार

महाराजगंज: उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्काराच्या घटनेनंतर सरकारवर टीकेची झोड उठलेली असतानाच, महाराजगंजमध्येही एका अल्पवयीन मुलीवर केल्याची घटना उघडकीस आली आहे. बॉयफ्रेंडसह अन्य तीन मित्रांनी तिच्यावर ऊसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य तिघा मित्रांचा शोध सुरू आहे. महाराजगंजमधील कोठीभार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चारही आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश नावाच्या तरुणाने फोन करून पीडितेला शेतात बोलावले. तिथे आधीच तिघे मित्र होते. सतीश आणि त्या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. संध्याकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी ती शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तात्काळ तिला सिसवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. तक्रारीनुसार, शेजारी गावातील सतीशने मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी तिथे गेल्यानंतर सतीश आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाबाहेर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, पीडितेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने भेटण्यासाठी बोलावल्यानंतर ती तिथे गेली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोघ घेण्यात येत आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lbUQ1V

No comments