ads

Breaking News

हाथरस: आग्र्यात सफाई कर्मचाऱ्यांचा संप, केली दगडफेक

आग्रा: उत्तर प्रदेशातील येथे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेवर प्रतिक्रिया म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यांनी पुकारलेले बेमुदत संप स्थगित करण्याच्या वाल्मिकी समाजाच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. महापालिका अधिकाऱ्यांनी बळजबरीने कचऱ्याच्या गाड्या बाहेर काढल्यामुळे त्यांच्या रागाने उग्र रुप धारण केले आणि या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत केली. रस्त्यावर उतरून दगडफेक करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज कराला लागला. जे सफाई कर्मचारी दगडफेकीत सहभागी झाले होते अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे शहर पोलिस अधीक्षक बोत्रे रोहन यांनी म्हटले आहे. आग्र्यातील तणाव पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चार दिवसांपासून संपावर आहेत सफाई कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून वाल्मिकी समाज प्रकरणी न्यायाची मागणी करत संपावर गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सर्किट हाऊसमध्ये वाल्मिकी महापंचायतसोबत अधिकाऱ्यांची चर्चा झाली. या बैठकीत समाजाच्या संघटनांनी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी लोहामंडी ठाणे क्षेत्रात राजनगर येथील आयडीएच वर्कशॉपवर कचरागाडी आल्याबरोबर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आणि संप स्थगित करू नये अशी भूमिका घेतली. क्लिक करा आणि वाचा- अपर नगर आयुक्तांशी झाला वाद या प्रकरणी अपर नगर आयुक्त आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. कचरागाड्या बळजबरीने बाहेर काढणे सफाई कर्मचाऱ्यांना आवडले नाही आणि ते संतापले. त्यांनी वाहनांची तोडफोड करणे सुरू केले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती मिळताच शहर पोलिस अधीक्षक, नगरआयुक्त आण जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून सफाई कर्मचारी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30uzhBO

No comments