Gandhi Jayanti 2020: कलाकाराची कमाल, माशांच्या टँकमध्ये गांधीजींचे चित्र
नवी दिल्ली: : राष्ट्रपिता (Father Of Nation) महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. अहिंसा चळवळीच्या (Non Violence Movement) जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे बापू आज देखील लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. या मुळेच आज गांधी जयंतीनिमित्त तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील एका मिनिएचर कलाकाराने माशांच्या टँकमध्ये महात्मा गांधीचे चित्र तयार केले आहे. माशांच्या टँकमध्ये जमा झालेल्या शेवाळाच्या मदतीने आपण महात्मा गांधींचे चित्र बनवल्याचे मिनिएचर कलाकाराने सांगितले. (miniature artist made beautiful images of Mahatma Gandhi inside fish tank) आपला देश हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. देशाचे हे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी आपण टँकमध्ये विविध रंगांचे मासे सोडले असल्याचे हा म्हणाला. क्लिक करा आणि वाचा- गांधी जयंतीचा इतिहास दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती साजरी केली जाते. २ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. जगभरात अहिंसावादी चळवळीचे प्रणेते अशी महात्मा गांधी यांची ओळख आहे. तसेच हा दिवस जागतिक स्तरावर त्यांच्या सन्मानार्थ जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधी जयंतीनिमित्त देशभर विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शासकीय पातळीवर देखील गांधी जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. परदेशात देखील महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अहिंसा हे एक दर्शन आहे, एक सिद्धांत आहे आणि एक अनुभव आहे. या आधारावर समाजाचे उत्तम संवर्धन करता येणे शक्य आहे, असे महात्मा गांधी म्हणत असत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36opXD8
No comments