ads

Breaking News

२४ तासांत पावणे तीन लाख करोनाबाधित, १६०० हून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : करोना संक्रमणाचा फैलाव टोकावर पोहचलेला असताना देशात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनच्या चर्चांणा ऊत आलाय. गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चा फेटाळून लावल्यानंतर संक्रमण रोखण्यासाठी निर्बंधांबाबत योग्य ते निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारवर येऊन पडलीय. अशा वेळेस आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी (१८ एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळले. याच २४ तासांत देशात १ हजार ६१९ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांनी करोनावर मात केलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७८ हजार ७६९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १९ लाख २९ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ उपचार सुरू : १९ लाख २९ हजार ३२९ एकूण मृत्यू : १ लाख ७८ हजार ७६९ रविवारी एकूण २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळले २४ तासांत देशात १ हजार ६१९ करोनाबाधितांचा मृत्यू २४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांनी करोनावर केली मात१२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ७८ लाख ९४ हजार ५४९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १३ लाख ५६ हजार १३३ नमुन्यांची करोना चाचणी रविवारी झाली.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e9cWjc

No comments