ads

Breaking News

धक्कादायक! दारू समजून सॅनिटायझर प्यायले, ५ जणांचा मृत्यू

यवतमाळ: दारूचे व्यसन जडलेल्या काहींना दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या सहाजणांपैकी तिघांचा घरी तर अन्य तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने रहावले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ( after drinking sanitizer in ) दत्ता लांजेवार ,नूतन पाथरटकर,गणेश नांदेकर, संतोष मेहर ,सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तीची नाव आहेत ज्याचा सॅनिटीझर पिल्याने मृत्यू झाला आहे. या सर्वांनी काल सॅनिटायझर घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना वणी येखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QTGTMa

No comments