ads

Breaking News

पंढरपूरचा प्रचार गाजवणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना करोना

प्रवीण सपकाळ । सोलापूर विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदानी तोफ यांना करोनाची बाधा झाली आहे. मिटकरी यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ही माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिटकरी यांच्याशी बैठका, सभांच्या माध्यमातून संपर्क आलेले नेते व कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे. ( Corona Positive) वाचा: करोना संकटाच्या काळात राज्यात विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही परस्परविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरींच्याही सभा घेण्यात आल्या होत्या. मिटकरी यांनी आमदार यांच्या समवेत या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत १२ तारखेला पंढरपूरात गोपाळपूर, माळीवस्ती, गोविंदपुरा, सांगोला चौक अशा चार सभा घेतल्या. त्यानंतर १३ तारखेला मंगळवेढा शहर, सिद्धापूर अशा आंधळगांव ३ मोठ्या, तर ग्रामीण भागात वाखरीसह १२ सभा घेतल्या होत्या. वाचा: मिटकरींनी दोन दिवसांत जवळपास २० सभांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी प्रचार केला. शिवाय वैयक्तिक गाठीभेटी, सत्कार, हस्तांदोलन, सेल्फी आणि स्नेहभोजन असा फड रंगला होता. त्यामुळं या दोन दिवसांत मिटकरी किमान दीड ते दोन हजार लोकांच्या संपर्कात आले असावेत, असा प्राथमिक अंदाज राष्ट्रवादीच्या सूत्रांनी वर्तवला आहे. त्यामुळं पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत. तर कार्यकर्ते धास्तावले आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uWlSPy

No comments