ads

Breaking News

बँंक कामाचे करा नियोजन; जाणून घ्या मे महिन्यात किती दिवस बँंका राहणार बंद

मुंबई : उद्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या मे महिन्यात तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. यात पाच दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असून उर्वरित शनिवार आणि रविवार आहेत. उद्या शनिवारी १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तर २ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. ८ मे रोजी दुसरा शनिवार आणि ९ मे रोजी रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील. दरम्यान, ७ मे रोजी जुमात ए विदाची जम्मू आणि श्रीनगर या परिक्षेत्रातील बँकांना सुट्टी असेल असे आरबीआयने म्हटलं आहे. १३ मे रोजी रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आहे. १४ मे रोजी अक्षय्य तृतीया , भगवान परशुराम जयंती , ईद उल फित्र निमित्त सार्वजनिक सुट्टी राहील. १६ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. २२ आणि २३ मे रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील. २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. तर मे महिन्यात शेवटचा रविवार ३० मे रोजी असून या दिवशी बँका बंद राहतील.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/331A0LB

No comments