ads

Breaking News

इंधन दर जैसे थेच! अजूनही 'या' शहरांमध्ये पेट्रोलसाठी मोजावे लागतात १०० रुपये

मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ चढ उतार असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १२ व्या दिवशी देशातील प्रमुख शहरांत ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७१ डॉलर प्रती बॅरलपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला होता. तब्बल १६ वेळा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांवर गेले होते. तो दर आजही कायम असून इंधन दरवाढीने तेथील नागरिक भरडून गेले आहेत. राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १००.८९ रुपये आहे. मध्य प्रदेशातील अनुपपूरमध्ये पेट्रोल १००.७९ रुपये आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशातील नगराबंधमध्ये पेट्रोल १०१.२९ रुपये, रिवा शहरात १००.४६ रुपये आणि छिंदवाडामध्ये पेट्रोलचा भाव १००.११ रुपये आहे. कच्च्या तेलाचा भाव कमी झाल्याने मार्च महिन्यात कंपन्यांनी तीन वेळा इंधन दर कमी केले होते. सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.१५ डॉलरच्या घसरणीसह ६५.९६ डॉलरपर्यंत खाली आला तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१० डॉलरने घसरला आणि प्रती बॅरल ६२.०४ डॉलर इतका झाला होता.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3nouVX6

No comments