ads

Breaking News

पत्नीला करोना झाल्यावरून वाद; पतीने केली हत्या, स्वतःही आयुष्य संपवले

पाटणा: बिहारमधील पाटणामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका स्टेशन मास्तरने आपल्या पत्नीची गळा चिरून केली. हत्येचे कारण उघड झाले आहे. पत्नी करोनाबाधित होती. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्याने रागाने पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर चार मजली इमारतीवरून उडी मारून केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. येथील पत्रकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये घडली. घटनेनंतर कुटुंबीयांनी पत्रकार नगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पत्नी करोना पॉझिटिव्ह होती. याचवरून पती चिडला होता. त्याने रागाने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या करणारा पती पाटणामध्ये रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून नोकरीला होता. प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, स्टेशन मास्तरची पत्नी ही करोनाबाधित होती. याचवरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nnNIlg

No comments