दरमहा १० हजार गुंतवणूक करेल कोट्याधीश; या कंपनीचा मल्टी असेट फंड ठरतोय लोकप्रिय
मुंबई : म्युच्युअल फंड उद्योगातील मल्टी असेट फंडाची श्रेणी बघितली तर यात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लोकप्रिय फंड ठरत आहे. या फंडाचे व्यवस्थापन एस. नरेन करत असून फंडाची कामगिरी या श्रेणीत सरस ठरली आहे. सर्वसाधारणपणे मल्टी अॅसेट फंड हे १० ते ८० टक्के समभागसंलग्न गुंतवणूक करतात. रोख्यांमध्ये १० ते ३५ टक्के आणि गोल्ड ईटीएफमध्ये १० ते ३५ टक्के गुंतवणूक करतात. तर REITs आणि InvITS मध्ये शून्य ते १० टक्के गुंतवणूक प्रमाण असते. गुंतवणूकदारांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे वैविध्यपूर्ण गुंतवणूक केली जाते. ज्यात डेट महागाईच्या विरोधात हेज करताना सोन्यात गुंतवणूक केली जाते. या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी असेट फंडाने दमदार कामगिरी केली आहे. हा फंड अव्वल स्थानी आहे. एक वर्षाचा विचार करता या फंडाने ६१.६ टक्के परतावा दिला तर या श्रेणीचा सरासरी ४२.४४ टक्के परतावा होता. ३ वर्षांत आयसीआयसीआय मल्टी फंडाने १०.०४ तर ५ वर्षांत १४.८ टक्के परतावा दिला आहे. जो या श्रेणीच्या तुलनेत सरस आहे. ऑक्टोबर २००२ या सुरुवातीपासून या फंडाची एनएव्ही ३४ पटीने वाढली आहे. अर्थात जर गुंतवणूकदाराने दरमहा १० हजारांची या फंडात गुंतवणूक केली तर आजच्या घडीला त्यातील एकूण गुंतवणूक मूल्य १ कोटी ३० लाखांपर्यंत वाढलेल आहे. म्हणजेच १८ वर्षात यात २२ लाख १० हजारांची गुंतवणूक झाली आणि त्याचे एकूण मूल्य १ कोटी ३० लाख इतके वाढले. 'व्हॅल्यू रिसर्च' या संस्थेच्या ५ एप्रिल २०२१ च्या अहवालानुसार आयसीआयसीआय मल्टी असेट फंडाने ५ आणि १० वर्षात नकारात्मक परतावा दिलेला नाही. या योजनेत पोर्टफिलिओचा जेव्हा विचार येतो, तेव्हा योजनेतील निधी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक सायक्लिकल पद्धतीची असते. त्याचबरोबर बेंचमार्कशी संबंधित क्षेत्रांमध्ये काही भाग गुंतवला जातो. जेव्हा इक्विटीचे मूल्यांकन अधिक असते तेव्हा इक्विटीतील गुंतवणूक कमी केली जाते. महागाईनुसार रणनीती आखून जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल यानुसार पोर्टफोलिओची बांधणी केली जाते. समभागांचे मूल्यांकन महागल्यावर ही योजना तेल, सोने, चांदी यांसारख्या कमॉडिटीजमध्ये आपली गुंतवणूक वाढवते, जेणेकरून पोर्टफोलिओचा परतावा चांगला राखला जातो. सद्य:परिस्थितीत अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत असल्याने या योजनेची समभागांमधील गुंतवणूक जास्त आहे. ३१ मार्च २०२१ अखेर फंडाची समभागसंलग्न गुंतवणूक ७७.७ टक्के राहिली आहे. सध्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. ३१ मार्च २०२१ अखेर या योजनेतील निधी पैकी ७७.७ टक्के निधी इक्विटीमध्ये गुंतवण्यात आला आहे. जो निर्धारित ८० टक्के गुंतवणूक मर्यादेच्या जवळपास आहे. मागील काही महिने महत्वाच्या शेअरला पसंती दिली जात आहे. पोर्टफोलिओमध्ये बँक, ऊर्जा, टेलिकॉम आणि मेटल या चार आघाडीच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात भांडवली बाजाराची चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे तूर्त इक्विटीचे मूल्यांकन महागच आहे. त्याशिवाय करोना लसीकरण, महागाई, आर्थिक विकास, जागतिक बँकांची पतधोरणे, आर्थिक पॅकेज आदी घटक भविष्यात परिणामकारक ठरतील. अशा अनिश्चिततेमध्ये गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3edUYfx
No comments