ads

Breaking News

एका पत्रावरून एवढी मोठी कारवाई?; देशमुख प्रकरणावर राष्ट्रवादीचा सवाल

म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर माजी गृहमंत्री यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे , असा आरोप ग्रामविकासमंत्री यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एका पत्राने एवढी मोठी कारवाई होऊ शकते का असा सवाल करत भाजपची ही राजकीय खेळी असून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण, अशा प्रयत्नाने सरकार अस्थिर होणार नाही, भाजपचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले. ( Questions Action Against ) वाचा: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं आज अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, काही ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले आहेत. सीबीआयच्या या कारवाईवर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा: 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब टाकला, तो राजकीय होता. भाजपच्या आदेशानंतरच ती राजकीय खेळी खेळण्यात आली होती. त्यांच्या एका पत्रावरून एवढी मोठी कारवाई होऊ शकते का? एखादा अधिकारी पुराव्याशिवाय पत्र देतो, आणि त्या पत्राच्या आधारावर पुराव्याशिवाय चौकशी होऊ शकते, हे सारे केवळ राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठीच आहे हे स्पष्ट होते, असं मुश्रीफ म्हणाले. 'अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा विश्वास मला वाटतो. ईडी, सीबीआय यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या वतीने वापर केला जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी यावेळी केला. माझ्यावर देखील ईडीची कारवाई केली होती. ती सुद्धा राजकीय चालच होती. त्यामुळं आताही दूध का दूध और पानी का पानी होईल,' असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aBR3YW

No comments