देशात एका दिवसात पावणे चार लाखांहून अधिक रुग्ण दाखल
नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला जोर देत बुधवारपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आलीय. पहिल्याच दिवशी १.३३ कोटींहून अधिक व्यक्तींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. याच दिवशी (बुधवारी, २९ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ७९ हजार २५७ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३६४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ६९ हजार ५०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालायकडून देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ०४ हजार ८३२ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३० लाख ८४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८
- उपचार सुरू : ३० लाख ८४ हजार ८१४
- एकूण मृत्यू : २ लाख ०४ हजार ८३२
- करोना लसीचे डोस दिले गेले : १५ कोटी ०० लाख २० हजार ८१४
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xt3r7v
No comments