ads

Breaking News

मोठ्या भावाची केली हत्या; मृतदेह घरामागे पुरला, अडीच वर्षांनी 'असा' झाला उलगडा

कोल्लम: केरळमधील येथे एकाने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीने नातेवाइकाची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागील बाजूस पुरला होता. अडीच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. एका व्यक्तीला संशय आल्यानंतर अडीच वर्षांनंतर या घटनेचा खुलासा झाला. शाजी पीटर असे मृताचे नाव असल्याची माहिती मिळते. तो बऱ्याच महिन्यांपासून आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहत होता. २०१८ मध्ये तो आपल्या घरी आला होता. मात्र, त्याचे आपल्या कुटुंबीयांशी पटत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, शाजी याने आपल्या लहान भावाच्या पत्नीसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याच्या लहान भावाने शाजीची हत्या केली, असे सांगण्यात येते. त्याची हत्या केल्यानंतर आई आणि पत्नीच्या मदतीने त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागेच पुरला. साजिन पीटर आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही घटना अडीच वर्षे लपवून ठेवली. शाजी पीटरच्या बाबतीत कुणी विचारणा केल्यावर तो केरळच्या मल्लापुरममध्ये काम करत असल्याचे ते सांगायचे. अडीच वर्षे त्यांनी कुणालाही काहीही माहिती पडू दिले नाही. अखेर अडीच वर्षांची या घटनेची उकल झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून साजिन पीटर, त्याची आई आणि पत्नी यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या माहितीच्या आधारे शाजी पीटरचा मृतदेह बाहेर काढला. चौकशी केली असता, पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने साजिन याने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीने त्याची हत्या केली आणि मृतदेह पुरला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xgnTbp

No comments