राज्यात आणखी कठोर निर्बंध; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
मुंबईः राज्यात करोना रुग्णसंख्येनं पुन्हा एकदा उचल खालली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन करण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे संकेतही आघाडीच्या मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज ३. ३० वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी ब्रेक द चेन अंतर्गंत निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री यांच्याकडेही त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे, असं सांगण्यात येत आहे. सध्याच्या नियमावलीत बदल करुन अधिक कठोर नियम करण्याची आवश्यकता असल्याचं, मत पवारांनी मांडलं असल्याचं समजते. गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकारचा निर्णय करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही किराणा दुकानात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या दुकांनाना सकाळी सात ते ११ या वेळेतच खुली ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विजय वडेट्टीवार यांचे संकेत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध पुरेसे नसून आणखी कडक लॉकडाऊन लागू करण्यावर विचार सुरू असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली असली तरी निर्बंधाची मर्यादा आणखी वाढवली जाण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री काही दिवसांत निर्णय घेतील, अस संकेत त्यांनी दिले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3akONFl
No comments