ads

Breaking News

दोन दिवसांपूर्वी मित्राच्या लग्नाला गेला होता, रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

फर्रुखाबाद: उत्तर प्रदेशातील एक खळबळजनक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून करण्यात आली. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला. मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि पिस्तुल सापडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृताच्या खिशात आधार कार्ड मिळाला आहे. त्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृताची ओळख पटवली. पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य असे मृताचे नाव असून, तो २२ वर्षांचा आहे. शमशाबादमदील पहाडपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू केला आहे. गावातील काही लोकांनी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आदित्य हा दोन दिवसांपूर्वीच त्याच्या मित्राच्या लग्नासाठी गेला गेला होता. जाताना त्याने सोबत दुचाकी नेली होती. रविवारी तो घरी परतणार असल्याचे सांगून गेला होता. मात्र, शमशाबाद हद्दीतील चिलसरा मार्गावर आदित्यचा मृतदेह रविवारी आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, चिलसरा मार्गावर एका झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास केला. तरुणाच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली. तेही घटनास्थळी पोहोचले. तरुणाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. तर गावातील काही जणांनी त्याची हत्या केली असा आरोप कुटुंबीयांनी केला. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या दिशेनेही तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2S2Slps

No comments