१२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, शेतात बेशुद्धावस्थेत फेकून आरोपी फरार
पूर्णिया: बिहारमधील जिल्ह्यातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संझा घाट गावात गवत कापण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर दोघांनी केला. हे दोन्हीही आरोपी गावातीलच रहिवासी आहेत. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मीरगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या आईने आणि मामीने सांगितले की, रविवारी मुलगी गवत कापण्यासाठी मक्याच्या शेतात गेली होती. आरोपी नितीश कुमार आणि मनीष कुमार हे दोघेही गावातच राहतात. मुलीचे तोंड दाबून त्यांनी तिला मक्याच्या शेतात घेऊन गेले. तिथे तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. बराच वेळ झाला तरी, मुलगी घरी आली नाही. त्यामुळे चिंतेत असलेले कुटुंबीय तिला शोधण्यासाठी गेले. मुलगी मक्याच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर कुटुंबीय मुलीला घेऊन मीरगंज पोलीस ठाण्यात गेले. या घटनेची माहिती त्यांनी गावातील प्रमुखालाही दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि गावचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. गावचे प्रमुख अमित कुमार यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली. दोन्ही आरोपी फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xrruDu
No comments