ऑक्सिजन निर्मितीसाठी अकोल्यात जगावेगळा प्रयोग
हर्षदा सोनोने । करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अकोला जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अकोल्यात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. () वाचा: अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासन व आरोग्य अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. कोविड रुग्णांवरील उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व बेडची कमतरता भासणार नाही, याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश कडू यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांचे आयसीयू युनिट तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करू शकणाऱ्या प्रकल्पालाही याच बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'येत्या काही दिवसांत हा प्रकल्प सुरू होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास भविष्यात कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही,' असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावं व प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही कडू यांनी केलं. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mRwxIO
No comments