निवडणुकांनंतर विजयी मिरवणुकीवर बंदी, निवडणूक आयोगाचे आदेश
नवी दिल्ली : करोना संक्रमणकाळात निवडणूक प्रचारादरम्यान करोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगानं मंगळवारी मोठा निर्णय जाहीर केलाय. येत्या २ मे रोजी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारे काढण्यावर आयोगानं बंदी घातलीय. त्यामुळे, राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी विजयाचा आनंद साजरा करता येणार नाही. मद्रास उच्च न्यायालयानं सोमवारी निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी करण्यात आलेल्या तयारीची 'ब्लू प्रिंट' मागितली होती. तसंच कोर्टानं निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरेही ओढले होते. करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी एकहाती जबाबदार आहे आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कदाचित हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान केली होती. तसंच करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर योग्य तयारीअभावी मतगणना रोखण्याचाही इशारा दिला होता. राजकीय पक्ष, नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते २ मे रोजी जाहीर होणाऱ्या विधानसभा निकालाकडे डोळे लाऊन बसलेले आहेत. अशावेळी निकाल जाहीर झाल्यानंतर करोना नियमांचं उल्लंघन करत अनेक मिरवणुका काढल्या जाण्याची शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय शुनावलाय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tUWFFn
No comments