coronavirus india update : करोनाची दुसरी लाट जीवघेणी; २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण, १५०० मृत्यू
नवी दिल्लीः देशात करोना दुसरी लाट आता आणखी धोकादायक बनत ( ) चालली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड आणि ऑक्सिजन तुटवडा जाणवत ( ) आहे. दुसरीकडे रुग्णांचा मृत्युही वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालाने देशातील करोना रुग्णांसंबंधीची आज सकाळी ताजी आकडेवारी जारी केली आहे. यात देशात गेल्या २४ तासांत करोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. देशात २,६१,५०० नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्राने दिली आहे. गेल्या वर्षी मार्चच्या सुरवातीला करोना संकटाच्या सुरवातीपासून आतापर्यंतही एका दिवसातील रुग्णांचीही सर्वाधिक संख्या आहे. देशात प्रथमच अडीच लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच गेल्या २४ तासांत करोनाने १५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी देशभरात १५०१ नागरिकांचा मृत्यू झाला. देशात सलग दुसऱ्या दिवशी करोना मृत्युच्या संख्येने विक्रम केला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत दिवसाला होणाऱ्या सर्वाधिक मृत्युंची संख्या ही १२९० होती. ही संख्या १६ सप्टेंबरला नोंदवली गेली होती. गेल्या दोन महिन्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ पटीने वाढल्याने स्थिती किती गंभीर आहे, हे यावरून लक्षात येतंय. देशात करोनाने होणाऱ्या एकूण मृत्युंची संख्या ही वाढून १,७७,१५० इतकी झाली आहे. तर देशातील सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती १८ लाखांवर गेली आहे. देशात १८,०१,३१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने बरे होण्याऱ्या रुग्णांच्या टक्केवारीतही घट झाली आहे. ही टक्केवारी ८६.६ इतकी झाली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीमही सुरू आहे. देशात करोनाविरोधी लढाईत १२ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e8HIZG
No comments