ads

Breaking News

#ResignModi हटवण्याचे निर्देश 'फेसबुक'ला दिले नाहीत: मोदी सरकार

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून प्लॅटफॉर्म ''ला 'मोदी राजीनामा द्या' (#ResignModi) हा हॅशटॅग हटवण्याचे कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले नव्हते, असा खुलासा केंद्रातील मोदी सरकारकडून करण्यात आलाय. #ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाल्यानंतर तो ब्लॉक करणं हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकेतील एक वर्तमानपत्र ''कडून करण्यात आला होता. हा आरोप संपूर्णत: भ्रामक असल्याचं ''कडून (Government of India) जाहीर करण्यात आलंय. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं ५ मार्च रोजी प्रकाशित केलेल्या बातमीचा उल्लेख करताना, ही बातमी संपूर्णत: बनावट आणि 'निर्मित' असल्याचं मोदी सरकारनं म्हटलंय. 'सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुकनंही हे स्पष्ट केलंय की हा हॅशटॅग चुकीनं हटवण्यात आला होता' असं 'भारत सरकार'नं म्हटलंय. 'भारतानं फेसबुक, व्हॉटसअप आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात धाडण्याची धमकी दिली' (India Threatens Jail for Facebook, Whatsapp and Twitter Employees) अशा मथळ्याखाली 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं ५ मार्च २०२१ रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. सरकारकडून या संपूर्णत: 'खोट्या' आणि 'रचित' माहितीवर आधारीत बातमीसंबंधी वॉल स्ट्रीट जर्नलला अधिकृतरित्या सूचित करण्यात आलं होतं, असंही भारत सरकारनं म्हटलंय. आमचे करोना योद्धे आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रयत्न समोर आणण्यात मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा संवेदनशील समयी कोट्यवधी सामान्य भारतीयांशी जोडून सर्व जण या महामारीविरोधात एकत्र उभे राहू असं आवाहन आम्ही मीडियाला करत आहोत, असंही यात वक्तव्यात म्हटलं गेलंय.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xvKbGd

No comments