पंढरपूरमध्ये का झाला राष्ट्रवादीचा पराभव? नाना पटोलेंनी दिलं उत्तर
मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार भगीरथ भालके यांना धोबीपछाड देत भाजपच्या (BJP) समाधान अवताडे यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र महाविकास आघाडीतून तीन पक्ष एकत्र लढत असतानाही दिवंगत आमदार भालक भालके यांच्या मुलाला पराभवचा चव का चाखावी लागली, याची आता चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता प्रदेशाध्यक्ष (Congress ) यांनी या पराभवाच्या कारणांवर भाष्य केलं आहे. 'पंढरपूरमध्ये झालेला पराभव महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे का?' असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, 'पंढरपूर पोटनिवडणुकीचे मुद्दे वेगळे होते. स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढली गेली. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याकडे असणाऱ्या विठ्ठल साखर कारखान्याबाबत लोकांना काही आक्षेप होते. अशा स्थानिक प्रश्नांमुळे आम्हाला अपयश आलं,' असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोलेंची पत्रकार परिषद; छगन भुजबळ-चंद्रकांत पाटील वादावरही केलं भाष्य पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना थेट इशाराच दिला. 'तुम्ही निर्दोष होऊन बाहेर आलेला नाहीत, जामीनावर आहात...त्यामुळे सांभाळून बोला,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या वादावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलण्यापेक्षा केंद्रातील सरकारमध्ये आणि गृहखात्यात नेमकं काय चाललंय हे पाहावं,' असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nJhT6x
No comments