पेट्रोल-डिझेल महागले; निवडणुका संपताच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा झटका
मुंबई : पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. कंपन्यांनी आज पेट्रोलमध्ये १५ पैसे आणि डिझेलमध्ये १८ पैशांची वाढ केली. आजच्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.९५ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९०.५५ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.५५ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल आज १४ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७६ रुपये झाला आहे. पेट्रोलप्रमाणेच आज डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज मुंबईत १७ पैशांनी महागले आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८७.९८ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव १८ पैशांनी वाढला असून तो ८०.९१ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८५.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८३.७८ रुपये प्रती लीटर आहे. यापूर्वी १५ एप्रिल २०२१ रोजी कंपन्यांनी इंधन दरांचा आढावा घेतला होता. त्यावेळी पेट्रोल दरात १६ पैशांची तर डिझेलमध्ये १४ पैशांची कपात करण्यात आली. तर त्याआधी दोन आठवडे इंधन दर जैसे थेच ठेवण्यात आले होते. २४ मार्चपासून देशभरात पेट्रोल ७७ पैशांनी तर डिझेल ७४ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर २०२१ मध्ये २६ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल ७.४६ रुपये आणि डिझेल ७.६० रुपयांनी महागले होते. एप्रिल महिन्यात क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वाढला आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या भावात किंचित वाढ झाली आहे . ब्रेंट क्रूडचा भाव ६७.०८ डॉलर झाला. त्यात ०.३२ डॉलरची वाढ झाली. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६३.९१ डॉलर प्रती बॅरल झाला. त्यात ०.३३ डॉलरची वाढ झाली. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या भावात ८ टक्के वाढ झाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वधारला आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/33d2Mci
No comments