ads

Breaking News

करोनाचा कहर; 'आॅक्सिजन'शी संबधित लघु उद्योजकांना तातडीने अर्थसहाय्य मिळणार

मुंबई : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आवश्यक आर्थिक सहाय्यासाठी मदत करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) प्रसार, वित्तसहाय्य आणि विकासासाठी काम करणाऱ्या प्रधान वित्त संस्थेतर्फे ‘श्वास’ (सिडबी असिस्टन्स टू हेल्थकेअर सेक्टर इन वॉर अगेन्स्ट सेकंड वेव्ह ऑफ कोव्हिड१९) आणि ‘आरोग’ (सिडबी असिस्टन्स टू एमएसएमई फॉर रिकव्हरी अँड ऑरगॅनिक ग्रोथ ड्युरिंग कोव्हिड-१९ पँडेमिक) या दोन योजना सुरू केल्या. या योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या अंतर्गत, आॅक्सिजन सिलिंडर्स, आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, आॅक्सिमीटर्स आणि अत्यावश्यक औषधांच्या पुरवठ्याशी संबंधित उत्पादन व सेवांसाठी सिडबीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला आहे. हॉस्पिटल्सना आॅक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या परिस्थितीत आपले योगदान देण्यासाठी सिडबीतर्फे, या महामारीला सामोरे जाण्यासाठी क्षमतावृद्धी करून देशाला मदत करण्यासाठी आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एमएसएमईंना मदत करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या प्रसंगी, सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “सध्याच्या निकडीच्या काळात ज्या एमएसएईंनी आपले काम सुरू ठेवले आहे आणि सर्व पातळ्यांवर आरोग्यसुविधा पुरवत आहेत त्या पात्र एमएसएमईंना क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.” कोव्हिड १९ मुळे निर्माण झालेला तणाव आणि राष्ट्रीय पातळीवर आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना सिडबीने, या महामारीशी लढा देण्यासाठी आरोग्य सेवा पुरवठादारांना सहाय्य करण्यासाठी योजना आखल्या आहेत. एमएसएमईकडून सर्व कागदपत्रे/माहिती प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत एमएसएमईंना ४.५० टक्के ते ६ टक्के या आकर्षक व्याजदराने २ कोटींपर्यंतच्या रकमेचा १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्याच्या या योजना आहेत. या योजनेचे तपशील www.sidbi.in या आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वर्षभरात १७८ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य सिडबीने २५ मार्च २०२० रोजी सिडबी असिस्टन्स टू फॅसिलिटेट इमर्जन्सी रिस्पॉन्स अगेन्स्ट कोरोना व्हायरस (सेफ) योजना सुरू केली. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठीची कोणतीही उत्पादने किंवा सेवा पुरविणाऱ्या (हँड सॅनिटायझर्स, मास्क, बॉडी सुट्स, व्हेंटिलेटर्स, चाचणी प्रयोगशाळा इ.) सर्व एमएसएमईंना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोव्हिड-१९ शी लढा देणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या ४०० हून अधिक एमएसएमईंना आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सेफअंतर्गत एकूण १७८ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले होते.


from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3t8vndl

No comments