मोदींनी करोनायुद्धाची सूत्रं गडकरींच्या हाती सोपवावीत : भाजप नेत्याचं ट्विट चर्चेत
नवी दिल्ली : भारत सध्या करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील आरोग्य यंत्रणा समोर आलेल्या अडचणींवर मात करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत असली तरी अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी, औषधांअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचं चित्र दिसून येतंय. सरकारी यंत्रणा या आव्हानासमोर अपुरी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रानं योग्य आणि कठोर पावलं उचलण्याची मागणीही केली जातेय. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्यसभा खासदार यांनी एका नव्या चर्चेची सुरुवात केलीय. करोना युद्धाची सूत्रं नितीन गडकरींवर सोपवावीत, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय. 'भारतानं इस्लामिक आणि ब्रिटिश घुसखोरांचाही सामना केलाय, तसंच देश करोनाशी दोन हात करेल. योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर आपल्याला करोनाच्या आणखीन एका लाटेचा सामना करावा लागू शकतो, यामध्ये लहान मुलांना अधिक धोका उद्भवू शकतो. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं व्यर्थ आहे. अशावेळी पंतप्रधान यांनी या युद्धाची जबाबदारी नितीन गडकरींना सोपवावीत', असं सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारी यंत्रणा फोल ठरत असल्याची चर्चा आहे. अनेक गैर-भाजपशासित राज्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अशा कठीण प्रसंगी राज्या-राज्यांत दुजाभाव करण्याचाही आरोप केला आहे. अशावेळी सुब्रमण्यम स्वामी यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xMWNZP
No comments