तृणमूल काँग्रेसच्या 'दिवंगत' उमेदवारानं जिंकली विधानसभा निवडणूक!
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालात एक वेगळाच प्रसंग समोर आलाय. उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच म्हणजे २५ एप्रिल रोजी काजल सिन्हा यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. वाचा : 'दिवंगत' काजल सिन्हा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांला २८,०४१ मतांच्या फरकानं मात दिल्याचं रविवारी समोर आलं होतं. परंतु, दु:खद म्हणजे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काजल सिन्हा मात्र या जगात नाहीत. करोना संक्रमणामुळे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काजल सिन्हा हे २१ एप्रिल रोजी करोना संक्रमित आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. काजल सिन्हा यांच्या मृत्यूमुळे खारदा मतदारसंघातील रिक्त जागेवर आता पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. पत्नीचा निवडणूक आयोगावर हत्येचा आरोप दरम्यान, दिवंगत तृणमूल नेते काजल सिन्हा यांच्या पत्नी यांनी खडदह पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवली होती. निवडणूक आयोगाचे अधिकारी करोना विषाणूचं संक्रमणाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरले आणि त्याचमुळे काजल सिन्हा यांचा मृत्यू झाला, असा आरोप नंदिता सिन्हा यांच्याकडून करण्यात आला. तसंच निवडणूक उपायुक्त सुदीप जैन तसंच इतर अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २६९, २७० तसंच ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही नंदिता सिन्हा यांनी केली होती.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u8RJg5
No comments