वादानंतर भाजपच्या जाहिरातींत पुन्हा अवतरले नितीश कुमार!
पाटणा : च्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. याच दरम्यान दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत जाहिरातींत पुन्हा एकदा अवतरल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीदरम्यान भाजपच्या जाहिरातींतून नितीन कुमार यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलं होतं. या जाहिरातींवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अगोदर वापरण्यात आला होता. आता मात्र यांचे फोटो पुन्हा एकदा वर्तमानपत्रांच्या जाहिरांतीत झळकू लागल्याचं दिसतंय. राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या आणि या दोन्ही पक्षांनी वृत्तपत्रांमध्ये स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे फोटो दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या छापील जाहिराती आणि पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा चेहरा गायब झाला होता आणि त्यानंतर विरोधी पक्षातील महाआघाडीने एनडीएत 'काहीतरी आलबेल' असल्याचा आरोप केला होता. यावरून एनडीएतील या दोन्ही पक्षांना विरोधकांचा सामना करावा लागला. वाचा : वाचा : आता मात्र, जेडीयूने छापलेल्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री नितीश आणि पंतप्रधान एकत्र दिसत आहेत. 'सर्वात मोठं काम म्हणजे मतदान, बिहारला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी नक्की मतदान करा' असं आवाहन या जाहिरातींतून जनतेला करण्यात आलंय. त्याखाली एनडीएतील चारही पक्षांच्या निवडणूक चिन्हाचा समावेश करण्यात आला आहे. जाहिरातीतून एनडीएला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 'ज्याला पडताळलंय, त्याचीच निवड करणार' असंही यात म्हटलं गेलंय. #VoteForNitish या हॅशटॅगचाही पोस्टरवर वापर करण्यात आलाय. भाजपकडूनही वर्तमानपत्रामध्ये अर्ध्या पानांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींतही एका बाजुला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी दिसत आहेत तर बाजुलाच पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संजय जयस्वाल दिसत आहेत. 'भाजप आहे तर विश्वास आहे, एनडीएलाच विजयी करा' असं यावर लिहिण्यात आलंय. दुसरीकडे, 'बिहार विश्वास त्याच्यावर, जो प्रामाणिक आहे, मेहनत ज्याच्या संस्कारात आहे' असंही म्हटलं गेलंय. वाचा : वाचा :
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mmcSz8
No comments