ads

Breaking News

हेड कॉन्स्टेबलने महिलेवर केला बलात्कार, धमकावले

गुरुग्राम: गुरूग्राम येथील हेड कॉन्स्टेबलने ३६ वर्षीय केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी हेड कॉन्स्टेबलविरोधात महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. द्वारका पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून हे प्रकरण पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी भादवि कलम ३७६ आणि ५०६ अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पीडित महिला दिल्लीतील उत्तम नगर येथे राहते. दिल्लीतील खासगी बँकेत ती नोकरी करते. तिने केलेल्या तक्रारीनुसार, '२०१७ मध्ये हरयाणातील सुधीर याच्याशी ओळख झाली. काही दिवसांनी मैत्री झाली. त्यानंतर सुधीरने सेक्टर ३९ मधील एका हॉटेलात नेले आणि बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, भयानक परिणाम होतील असे धमकावले. त्यानंतर विविध ठिकाणी बलात्कार केला.' आरोपी सुधीर हा गुरुग्राम शहर पोलिसांत कार्यरत आहे. महिलेने केलेले आरोप चुकीचे आहेत. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे त्याने सांगितले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी केली जात आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33vRDEx

No comments