ads

Breaking News

अल्पवयीन मुलीवर कॅमेऱ्यासमोर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

दमोह: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये बलात्काराच्या घटनेने देश हादरला असून, आता मध्य प्रदेशातही अल्पवयीन मुलीवर केल्याची घटना उघडकीस आली आहे. दमोहमध्ये दोघा जणांनी कॅमेऱ्यासमोर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ ग्रामस्थांच्या मोबाइलवर शेअर केल्यानंतर खळबळ माजली आहे. मुलीवरील बलात्काराचा व्हिडिओ काढणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केला आहे, त्या आरोपींची ओळख देखील पटवण्यात आली आहे. तसेच मोबाइलवरून व्हायरल व्हिडिओ डिलिट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरला आरोपींनी मुलीवर तिच्या घरातच बलात्कार केला. व्हिडिओ काढून २० वर्षीय आरोपीने मुलीला ब्लॅकमेल केले. शुक्रवारी शहरापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या गावात हा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी शुक्रवार आणि शनिवारी रात्रीपर्यंत २५ जणांच्या मोबाइलमधून हा व्हिडिओ डिलिट केला आहे. सायबर सेलची मदत घेतली जात आहे. एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.


from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36rQsaZ

No comments