धक्कादायक! बॉडी बिल्डरने स्टेरॉइडचा ओव्हरडोस घेऊन केली आत्महत्या
सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये एक धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. एका ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह कारमध्ये आढळला. मृत तरूण जीमचा संचालक होता. त्याने केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्याने स्टेरॉइडचा ओव्हरडोस घेऊन जीवन संपवले. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजता अदाजान परिसरातील मेजल केरीवाला याचा मृतदेह कारमध्ये आढळला. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवले. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाजवळ इंजेक्शन आणि सिरिंज आणि द्रवपदार्थ सापडले. त्याच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा होत्या. त्यामुळे तरूण इंजेक्शन घेत असल्याचे स्पष्ट झाले. इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या पोलिसांच्या माहितीनुसार, मेजल याने स्टेरॉइडचे इंजेक्शन घेतले. ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला. अदाजान पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी मेजल याने आत्महत्या करण्यासाठी स्टेरॉइडचा ओव्हरडोस घेतला. त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याने नेमके कोणते इंजेक्शन घेतले याचा शोध घेतला जात आहे. मेजल हा बॉडी बिल्डर होता. काही स्पर्धांमध्ये त्याने यशही मिळवले होते. दोन वर्षांनंतर त्याने स्वतःची जीम सुरू केली होती. तो काही दिवसांपासून तणावग्रस्त होता.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ju6YLp
No comments