ads

Breaking News

Video: इमारतीच्या २२व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट करणारा 'तो' तरूण...

मुंबई: परिसरातील इमारतीच्या २२ व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरूणाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. नोमान डिसूजा असे या तरूणाचे नाव असून, त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. उंच इमारतीवर एक तरूण मृत्यूला आमंत्रण देणारा स्टंट करत असल्याचे या व्हिडिओत दिसत होते. याबाबत मुंबई पोलिसांकडे काही जणांनी तक्रार केली होती. पोलीस संबंधित तरुणांचा शोध घेत होते. कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा परिसरातील जय भारत सोसायटीच्या २२ व्या मजल्यावरून तरूण स्टंट करत होता. तर त्याचे दोन साथीदार हा व्हिडिओ शूट करत होते. तरूण २२ व्या मजल्यावरील कठड्यावर स्टंट करत होता. अवघी दोन फूट रुंद असलेल्या कठड्यावर तो एका दोन्ही हातावर उभा राहिला होता. मृत्यूला आमंत्रण देणारा हा स्टंट केल्यानंतर त्याने खिडकीच्या कठड्यावरून उडी घेऊन इमारतीत गेला. एनर्जी ड्रिंक घेतले. हा थरारक व्हिडिओ त्याचे दोन साथीदार शूट करत होते. ११ ऑक्टोबरला हा व्हिडिओ शूट केला होता. पोलिसांनी या तरुणांचा शोध सुरू केला होता. अखेर कांदिवली पोलिसांनी स्टंटबाज तरूणाला ताब्यात घेतले आहे. नोमान डिसूजा नावाच्या या तरुणाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2H6p9Zg

No comments