पेट्रोल-डिझेल ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला इंधन दरांबाबत हा निर्णय
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि स्थिर आहेत. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे १६ पैसे आणि १४ पैशांची कपात केली होती. त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला होता. आज शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. तर एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.५७ डॉलरच्या तेजीसह ६६.९४ डॉलरवर गेला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.५८ डॉलरच्या तेजीसह ६३.४६ डॉलर झाला. मागील काही दिवस इंधन मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत १ लाख २३ हजार ३५४ जणांनी करोनावर मात केली तर १ हजार ३४१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3x1GFTU
No comments