पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र; धनंजय मुंडे यांना केले लक्ष्य
परळी: राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळं औषधे व आरोग्य सुविधांची टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. जिल्ह्याजिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री यांनी आरोग्यमंत्री यांना पत्र लिहिलं असून जिल्ह्याकडं लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. (Pankaja Munde Writes To ) वाचा: आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पंकजा यांनी ट्वीट देखील केलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती टोपे यांना दिली आहे. 'बीड जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. परिस्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार ९८९ लोक आतापर्यंत बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुरेशी लस नसल्यानं लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या साऱ्याकडं आपण जातीनं लक्ष द्यावं व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं,' अशी विनंती पंकजा यांनी केली आहे. वाचा: 'राज्याला मिळालेल्या लसीच्या दोन लाख डोसेसपैकी केवळ २० डोस बीड जिल्ह्याला मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करून द्यावेत,' असंही पंकजा यांनी म्हटलं आहे. 'बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,' असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडे यांना सणसणीत टोला हाणला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wWvfRg
No comments