इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. काल गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात अनुक्रमे १६ पैसे आणि १४ पैशांची कपात केली होती. आज शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात १६ वेळा इंधन दरवाढ केली होती. यामुळे काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्या १६ दिवसात पेट्रोल ४.७४ रुपयांनी महागले होते. तर डिझेलमध्ये या १६ दिवसांत झालेल्या दरवाढीने ४.५२ रुपयांची वाढ झाली होती. तर एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात इंधन दर स्थिर ठेवले होते. जागतिक कमॉडिटी बाजारात बुधवारी तेजी दिसून आली होती. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ५ टक्क्यांनी वधारला होता. आज शुक्रवारी अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.५७ डॉलरच्या तेजीसह ६६.९४ डॉलरवर गेला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.५८ डॉलरच्या तेजीसह ६३.४६ डॉलर झाला. मागील काही दिवस इंधन मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/2Qp85Ci
No comments