'त्या' गुन्ह्यातील १५ सराईत आरोपींना मोक्का; नाशिक पोलिसांचा दणका
म. टा. खास प्रतिनिधी, : अल्पवयीन मुलीवर करणाऱ्या सात आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य गुह्यातील आठ अशा तब्बल पंधरा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार () कारवाई केली. बलात्काराच्या गुन्ह्यामुळे कोळे गँगचे अनेक पराक्रम बाहेर पडले. या गँगमधील काही सदस्यांवर जबरी चोरी, लूटमार या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गँगमध्ये एक महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. एकलहरा रोड भागातील अल्पवयीन मुलीवर ७ व ९ जानेवारी रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. या गँगमधील महिलेने मुलीस आपल्या घरी घेऊन जात हे कृत्य घडवून आणले होते. या ठिकाणी गँगचा म्होरक्या सुनील कोळे, दीपक खरात, सोमनाथ खरात, आकाश गायकवाड, रवी उर्फ फँड्री, विधी संघर्षित बालक आदींनी बालिकेस पोटात चाकू खुपसण्याचा धमकी देत बळजबरीने सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या प्रकरणांकडे गांर्भीयाने लक्ष दिले. पोलिसांच्या तपासात संशयित सुनील कोळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे आणि त्याची टोळी असल्याची माहिती समोर आली. या टोळीने कल्याण, संगमनेर, उपनगर, नाशिकरोड याठिकाणी जबरी चोरी, लूटमार, सारख गुन्हे केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी शहरातून संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या दृष्टीने सुनील कोळे यांच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांविरोधात मोक्कानुसार कारवाईचे आदेश दिले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्याने दिलेल्या प्रस्तावास पोलिस आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. चार महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याच्या दृष्टीने खुनाच्या गुह्यातील २२ जणांच्या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तर सहा जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. ... यांच्याविरोधात मोक्का गँगचा म्होरक्या सुनील कोळे, दीपक खरात, सोमनाथ खरात, आकाश गायकवाड, रवी उर्फ फँड्री कुऱ्हाडे, पूजा सुनील वाघ, श्राहुल उर्फ सोम्या विजय खरात, आकाश आठवले, अमोल शेजूळ, रहेमान शेख, सायमन मॅनवेल, समीर खान, ताजमुल सैय्यद, भूषण दोडमल, किशोर गिरी.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3asmNzL
No comments