पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दराल कोणताही बदल केला नाही. सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. ब्रेंट क्रूडचा भाव ०.६६ डॉलरच्या तेजीसह ६७.१९ डॉलर झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६० डॉलरच्या तेजीसह ६३.५० डॉलर प्रती बॅरल झाला. दरम्यान, भारतात करोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी काही राज्यांनी रात्रीची कठोर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे इंधन मागणीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी (१९ एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ५९ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याच २४ तासांत देशात १ हजार ७६१ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ५४ हजार ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात करोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय ठरलाय. करोना संक्रमणानं अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेलं असताना आरोग्य व्यवस्था मात्र अपुऱ्या पडत चाललेलं चित्रं देशात दिसून येतंय.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3stlFlz
No comments