ads

Breaking News

अमरावती: क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली; रागाच्या भरात केली तरूणाची हत्या

अमरावती: शहरातील एका २० वर्षीय तरुणाची निर्घृण करण्यात आली. क्षुल्लक वादातून ही हत्या झाली. दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. तसेच चाकूने सपासप वार केले. त्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तपास सुरू आहे. अमन किशोर खंडारे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जेवडनगर येथील रहिवासी होता. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अमनचा परिसरातच दोन युवकांसोबत क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. अमन आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी अमनवर धारदार चाकूने सपासप वार केले. त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा आढावा घेतला. तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी छत्री तलाव जंगल परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणात सखोल तपास करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vgT2cO

No comments