राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नका; अजित पवार भडकले
पुणे: 'टीव्हीच्या पडद्यावर चमकण्यासाठी हापापलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, बिनबुडाचे आरोप करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करू नये. करोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करू नये,' असा इशारा उपमुख्यमंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला आहे. ( Slams ) चंद्रकांत पाटील यांनी अलीकडंच अजित पवार हे नेटवर्कबाहेर असल्याची टीका केली होती. त्या टीकेला अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार उत्तर दिलं आहे. 'अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलीकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती,' असा सणसणीत टोला अजित पवारांनी पाटलांना हाणला आहे. वाचा: 'दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी मी सर्वांना उपलब्ध असतो. सन्माननीय मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरू असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरू असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरू आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे, असेही अजित पवार म्हणाले. वाचा: महाराष्ट्र सध्या करोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. करोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. सर्वांशी संवाद ठेवून त्यातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करून महाराष्ट्राची करोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा करोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम करत असून ही लढाई महाराष्ट्र जिंकेलच, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32TnSwl
No comments