ads

Breaking News

महाराष्ट्रातील जनतेचं मोफत लसीकरण होणार; नवाब मलिकांनी दिले संकेत

मुंबईः करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येईल, असं केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलं आहे. यानंतर राज्य सरकारही जनतेचं मोफत लसीकरण करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी दिले आहेत. राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले. वाचाः मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही माहितीही नवाब मलिक यांनी दिली आहे. तर राज्याची अडचण दूर होईल केंद्राने रेमडेसिवीरचा साठा वाढवून दिला त्याबद्दल केंद्राचे आभार मात्र आम्ही सांगितलेला ५० हजाराचा साठा दिला तर राज्याची अडचण दूर होईल, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32MPQcQ

No comments