ads

Breaking News

अकोला: अकोट हादरले, पूर्ववैमनस्यातून २४ वर्षीय तरुणाची हत्या

अकोला: शहरातील अकबरी प्लॉट भागात पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील अकोट शहरातील अकबरी प्लॉट परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आली. काल, बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून अब्दुल सलमान अब्दुल रज्जाक (वय २४) याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे प्रमुख संतोष महल्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा आढावा घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. अब्दुल सलमानची हत्या जुन्या वादातून करण्यात असल्याची माहिती समजते. मारेकर्‍यांनी अकबरी प्लॉटमध्ये अब्दुल सलमान याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यानंतर सलमान जमिनीवर कोसळला. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. अब्दुल सलमानचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची धरपकड सुरू केली. रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू होती. अब्दुल सलमान याची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या हत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अकोट पोलीस पुढील तपास करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3veWzsr

No comments